ग गोष्टीचा नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये, जिथे आम्ही दर आठवड्याला एक गोष्ट घेऊन येत आहोत. Season 1 मध्ये एक भारतीय लहान मुलगी आणि तिची जर्मनीतील जीवन कथा जिचे नाव आहे ईशा. ईशा, तिच्या आयुष्याच्या छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये एक नवा दृष्टिकोन आणि अनोखा अनुभव जगते आहे. जर्मनीत असलेली एक परदेशी वस्ती, वेगळ्या संस्कृतीशी निगडीत आणि तिच्या आयुष्यातील साध्या पण महत्त्वाच्या घटना असलेल्या या कथा आपल्याला खूप आनंद देतील. या गोष्टींमध्ये धाडस, प्रेम आणि छोटे छोटे आनंदाचे क्षण दडलेले आहेत, जे ईशाने स्वतः तिच्या जीवनात अनुभवले आहेत. तिला छोट्या छोट्या गोष्टीतून मिळालेलं मोठं शिक्षण आणि आपलं 'घर' म्हणजे काय, यावरचा तिचा दृष्टिकोन –कथांच्या स्वरूपात आपल्याला ऐकायला नक्कीच मजा येईल. चला तर मग, ऐकूया ईशाच्या जर्मनीतल्या गोष्टी.
© 2025 ग गोष्टीचा
Sign up to track rankings and reviews from Spotify, Apple Podcasts and more.