आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा.. संकल्पना व लेखन - अपर्णा मोडक, सरोज करमरकर, वैद्या स्वाती कर्वे. सृजन सख्या ची माहिती विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्हा पंधरा मैत्रिणींची सृजन सख्या ही संस्था सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा.
2025 Ep.Log Media Pvt. Ltd. | All Rights Reserved
Sign up to track rankings and reviews from Spotify, Apple Podcasts and more.